27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeनांदेडचाकु हल्ल्यातील जखमी तरूणाचा मृत्यू

चाकु हल्ल्यातील जखमी तरूणाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड : गणेश नगर भागात दि २४ ऑगस्ट रोजी जुन्या वादातून विक्की पोटभरे (वय ३२) वर्षीय तरूणावर काहींनी चाकु हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले होतेÞ या हल्यात विक्की पोटभरे याचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघाविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहेÞ किरकोळ कारणावरून झालेल्या वादातही आरोपीकडून शस्त्राचा वापर केला जात आहेÞ कोणतीही कारवाई होत नसल्याने गुन्हेगार मात्र गुन्हे करत बिनदास्त फिरत आहेतÞ दरम्यान सिडको भागात ढवळे कॉर्नरजवळ गुरूवार (दिÞ१) रोजी एका वाईनशॉवरील व्यवस्थापकाचा चाकुने भोसकून खून केल्याची घटना घडली.

सदर घटना ताजी असताना आठ दिवसापूर्वी चाकु हल्ल्यात जखमी झालेल्या एका ३२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहेÞ दि.२४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्यासुमारास विक्की सुखदेव पोटभरे (३२) रा.जयभिमनगर नांदेड हा गणेशनगर रस्त्यावरून जात असतांना अनिकेत उर्फ सोनु सुरेश गायकवाड, बिटू संघरत्न लोखंडे आणि सतिश विश्वनाथ वंजारे या तिघांशी त्याचा जुन्या कारणावरुन वाद झाला. यावेळी अनिकेत उर्फ सोनु सुरेश गायकवाड याने विक्की पोटभरेच्या पोटात चाकू खुपसला.

त्यावेळी विक्कीचा मित्र हा वाद सोडवायला आला असतांना इतरांनी त्यांच्यावरही धार-धार शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर आरोपी तेथून फरार झाले. याप्रकरणी विक्की पोटभरे याच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीसांनी तिघांविरूद्ध गुरनं २६/२०२२ भादंवी कलम ३०७ आणि ३४ नुसार दाखल केला होताÞ मात्र चाकु हल्लयात गंभीर जखमी झालेल्या विक्की पोटभरे या तरूणाचा शुक्रवारी (दिÞ२ सप्टें) रोजी मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता खूनाचे कलम ३०२ पोलीसांनी वाढवले आहेÞ सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक उमाकांत पुणे यांच्याकडे देण्यात आला आहे. तीनही फरार आरोपीं शिवाजीनगर पोलीस शोध घेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या