22.2 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home नांदेड तरूनाने केले शिमला मिर्ची, वांग्याचे विक्रमी उत्पादन

तरूनाने केले शिमला मिर्ची, वांग्याचे विक्रमी उत्पादन

एकमत ऑनलाईन

लोहा : लोहा तालुक्यातील पिंपळगाव ढगे येथील उच्च शिक्षीत तरूणाने आपल्या शेतात शिमला मिर्ची व वांग्याची लागवड करून लाखो रूपयांचे उत्पन्न काढले आहे. अशी आधुनिक शेती करून शेतक-यांनी बेकारीवर मात करावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने केले आहे. सध्याचे शिक्षण युवकांना वाटते की शिक्षण घेतले की नोकरी मिळते पण असे नाही माणसाला समाजाच्या लोकांसोबत कसे रहायचे व कसे जगायचे हे शिक्षण घेतल्यामुळे कळते पण उच्च शिक्षण घेऊन नौकरी च्या नादी न लागता युवकांनी शेती व्यवसायात येवून आपण नौकरी पेक्षा जास्त उत्पन्न करू शकतो हे समाजाला दाखवुन दिले आहे यांचे ताजे उदाहरण म्हणजे लोहा तालुक्यातील पिंपळगाव ढगे या गावातील युवकांने ढोबळ मिरची व भरत्या वांंग यांची शेती करून लाखो रुपये चे उत्पन्न करून समाजाच्या समोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

लोहा तालुक्यातील पिंपळगाव ढगे येथे शेतकरी शिवराज विश्वांभरराव ढगे यांच्या शेतात ढोबळी मिरची व भरत्या वांग यांची लागवड १४ आक्टॉबर २०२० ला केली त्याचे उत्पन्न आता चालु आहे १एकर१०गुंट्टे शिमला मिर्च ओपन मध्ये लागवड तर भरत्या वांग २० गुंट्टे शेडनेट मध्ये लागवड केली सर्वना मल्चिंग व टिबक केले आहे व आता पर्यत तिन तोडे झाले आहेत १६ टन शिमला तर ९ टन वांगे उत्पन्न आता पर्यत मिळाले आहे. ते माल विक्रीसाठी हैदराबाद ला नेले जाते व आता सध्या दर २८/३०रू किलो प्रमाणे चालु आहें तरी एकदरीत सर्व उत्पन्न आपेक्षीत शिमला ५०टन तर वांग ३०टन आपेक्षीत ही भावना उच्च शिक्षात ओम पाटिल ढगे शेतकरी यांनी बोलुन दाखवली व सर्व नियोजन ओम ढगे हे स्वत: करतात व या युवकानी शेती मध्ये दर आठ दिवसाला शिमला व वांग यांचे १० टन म्हनजेच १००किंन्टल माल काडुन रेकार्ड ब्रेक केले व शेतीमध्ये हिरवे सोन उगवुण युवकाना प्रेरणा दिली आहे.या व्यवसाय तुन आपला व आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला जात आहे त्यामुळे नौकरी च्या नादी न लागता शेतात विविध उपक्रम राबवुन लाखो रुपये चे उत्पन्न केले आहे यांच्या आदर्श इतरांनी घेण्या जोगे आहे.

शेतक-यांनी आधुनिक शेती करून नवनविन वाणाची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करणे काळाजी गरज आहे. शेतक-यांनी आपल्या शेतात शेड नेट उभारून अनुदान तत्वावर शासनाकडुन अनेक योजना ठेवण्यात आल्या आहेत याचा फायदा प्रत्येक शेतक-यांनी आपल्या शेतात नवनविन प्रयोग करून आधुनिक शेतीकडे वळावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

ही तर नेहमीचीच रड !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या