26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeनांदेडजि.प. प्राथमिक शाळा नवरंगपुरा गुणवत्ता एक्सप्रेस

जि.प. प्राथमिक शाळा नवरंगपुरा गुणवत्ता एक्सप्रेस

एकमत ऑनलाईन

कंधार : कोरोना महामारित शाळा बंद असल्या तरीही आनलाईन शिक्षणाचे धडे मात्र चालु आहेत..जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवरंगपुरा एक्सप्रेस चा आनलाईन उपक्रम सद्या जोरात चालू आहे. तालुक्याच्या जवळ असलेला व ऐतिहासिक जगतुंग समुद्राच्या सानिध्यात वसलेला तथा ऐतिहासिक किल्याच्या जवळ असलेला नवरंगपुरा हे गाव या गावात जिल्हा परिषद ची पाचवी पर्यत शाळा असुन सद्याच्या कोविड काळात शाळा बंद असल्यामुळे शाळा बंद परंतु शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत येथील शिक्षक युसूफ शेख व सहशिक्षिका स्वाती मुंडे यांच्या संकल्पनेतुन माझा अभ्यास घरचा अभ्यास तथा सेतू अभ्यासक्रम या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन आनलाईन तथा आफलाईन अभ्यास देऊन गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत तसेच सुंदर माझी शाळा या योजनेत शाळेला रेल्वेचा आकार दिल्याने नवरंगपुरा गुणवत्ता एक्सप्रेसच असेच वाटत आहे.

कंधार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय येरमे व भाग विस्तार अधिकारी अंजली कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानगंगा हा उपक्रम ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवरंगपुरा येथे राबवला जात आहे. यात माझी विद्यार्थी गल्लीनुसार सकाळ व दुपार सञात विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांच्या मार्फत वृक्षारोपण करण्यात आले.नवरंगपुरा गुणवत्ता एक्सप्रेस ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी धावेल आसेही शेख युसूफ व स्वाती मुंडे यांनी म्हटले आहे. या प्रसंगी बहाद्दरपुरा संकुलाचे केंद्रप्रमुख मेहरबान पवार केंद्रीय मुख्याध्यापक सुनिल गवळे यांनीही नवरंगपुरा गुणवत्ता एक्सप्रेसला शुभेच्छा दिल्या.

अफगाणिस्तानात भारताने केलेले बांधकाम पाडा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या