21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडजि.प. शाळेत अज्ञात गावगुंडांचा धुडगूस

जि.प. शाळेत अज्ञात गावगुंडांचा धुडगूस

एकमत ऑनलाईन

धमार्बाद : अत्यंत गौरवशाली समजल्या जाणा-या जारीकोट येथील जिल्हा परिषद शाळेत गावगुंडांनी अक्षरश: धुडगूस घालत शाळेच्या दारे व खिडक्या तोडून नासधुस केली आहे.दहा दिवसानंतर दुस-यांदा हा प्रकार झाला आहे. जारीकोट येथील जिल्हा परिषद शाळेमधून अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये आपल्या गावचे व आपल्या शाळेचे नाव उज्वल करीत आहेत.अशी गौरवशाली परंपरा असतांना अज्ञात गावगुंड गेल्या दहा पंधरा दिवसापासून जारीकोटच्या जिल्हा परिषद शाळेच्या खोलीची दारे व खिडक्या तोडून आत मध्ये धुडगूस घालत आहेत.

या पुर्वी झालेल्या घटनेबाबत शाळेच्या वतिने धमार्बाद पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार देण्यात आली होती. परंतु या तक्रारीच्या अनुषंगाने कुठलीही ठोस अशी कारवाई झाली नाही त्यामुळे या गाव गुंडाचे मनोबल वाढतच चालले आहेत .त्यानंतर परत एकदा आठ ते दहा दिवसानंतर धुडगूस घालत अज्ञांतानी शाळेची दारे,खिडक्या तोडून शाळेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची, वस्तूची नासधुस केली आहे. शाळेमध्ये घडत असलेल्या या प्रकारामुळे मात्र विद्यार्थी व गावातील नागरिकात चिंतेचे वातावरण परसले आहे.

गुप्तधन काढण्याचा प्रयत्न; आठ जणांवर गुन्हा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या