22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeनांदेडजि.प.शाळा बनली जुगाराचा अड्डा

जि.प.शाळा बनली जुगाराचा अड्डा

एकमत ऑनलाईन

बरबडा : नायगाव तालुक्यातील हिप्परगा (जा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही जुगाº्यांचा अड्डा बनला असून गावातील सर्व अवैध धंदे या ठिकांणी राजरोसपणे चालतात.

हिप्परगा येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून येथे पहिली ते सातवी पर्यन्तचे वर्ग आहेत. शाळेची एकइमारत आहे.येथील काही लोक या इमारतीचा उपयोगभी खाजगी कामासाठी करीत असल्याच्या तक्रारी पुर्वी पासूनच नेहमीच होत आल्या आहेत.पाऊस आला किंवा उन पडले तर येथे गुरे ढोरे बांधली जातात.त्यामुळे जनावरांच्या मलमुत्राचा उग्रवास येथे घुमतो.

कुत्रे असो वा मांजर मेल्यानंतर फेकण्यासाठी सोप्पी जागा म्हणजे शाळेचा परीसर. शाळेच्या परिसरात नेहमी जुगाराचा अड्डा असतो.ही शाळा गावातील दारुड्यांच दारुप्यायच सुरक्षीत ठिकान बनली आहे.कोरोना विषाणुमुळे लॉकडाऊनच्या काळात सद्या शाळा बंद आहेत.  त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक शाळेकडे फिरकत नसल्याने येथील दारुड्यांना मोकळे रान मिळाले आहे. येथील शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन हा सर्व गैरप्रकार तात्काळ थांवावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली जात आह

Read More  पंढरपुरात एकाच दिवशी ६८ कोरोना बाधित रुग्ण

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या