Homeमहाराष्ट्रनाशिकच्या 'टीसीएस' प्रकरणाची मुंबईत पुनरावृत्ती; नोकरी सोडल्यानंतर तरुणीला अश्लील मेसेज, आरोपी जेरबंद

नाशिकच्या ‘टीसीएस’ प्रकरणाची मुंबईत पुनरावृत्ती; नोकरी सोडल्यानंतर तरुणीला अश्लील मेसेज, आरोपी जेरबंद

मुंबई: नाशिकमधील ‘टीसीएस’ (TCS) कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण ताजे असतानाच, आता मुंबईतही तसाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका टेलिकॉलिंग कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने नोकरी सोडल्यानंतर तिला अश्लील मेसेज पाठवून त्रास देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मुंबईतील एका नामांकित टेलिकॉलिंग फर्ममध्ये काम करत होती. काही वैयक्तिक कारणांमुळे आणि कामाच्या ठिकाणच्या वातावरणामुळे तिने काही दिवसांपूर्वी आपली नोकरी सोडली होती. मात्र, नोकरी सोडल्यानंतरही तिचा त्रास संपला नाही.

पीडितेने नोकरी सोडल्यानंतर त्याच कंपनीत काम करणाऱ्या एका आरोपीने तिला व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. आरोपी तिला सतत फोन करून अश्लील मागणी करत होता. पीडितेने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले, मात्र आरोपीचा त्रास वाढल्याने आणि त्याने तरुणीचे काही खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचे लोकेशन शोधून काढले आणि त्याला अटक केली. आरोपीवर विनयभंग आणि आयटी ॲक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या टीसीएस कंपनीतही अशाच प्रकारे महिला कर्मचाऱ्यांना ‘टार्गेट’ केले जात असल्याचे उघड झाले होते. तिथेही अश्लील मेसेज, धर्मांतराचा दबाव आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप झाले होते. मुंबईतील या नव्या घटनेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR