16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयअल्पवयीन मुलाचे क्रूर कृत्य, चौघांची केली हत्या

अल्पवयीन मुलाचे क्रूर कृत्य, चौघांची केली हत्या

एकमत ऑनलाईन

धलाई : त्रिपुराच्या धलाई जिल्ह्यात रविवारचा दिवस एका कुटुंबासाठी रक्तात माखणारा ठरला. दुर्गम गावात १६ वर्षाच्या मुलाने अंमली पदार्थांच्या नशेत कुटुंबातील तीन सदस्यांची आणि शेजारी राहणा-या एकाची कु-हाडीने हत्या केली. मुलाने हे मृतदेह विहिरीत फेकून दिले.

कमलपूर उपविभागातला हा मुलगा नियमित ड्रग्ज घेत होता. शनिवारी त्याने नशेच्या धुंदीत आई, आजोबा, १० वर्षांची बहीण आणि शेजा-याची हत्या केली. त्याचे वडील घरापासून दूर गेले होते. त्यामुळे सुदैवाने ते वाचले.
ते घरी आल्यानंतर रक्ताने माखलेले मृतदेह पाहून वडिलांनी ओरडा ओरडा सुरु केला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. सर्वांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या