22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयआंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी कायम

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी कायम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनाची स्थिती पाहता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीबाबत काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला होता. पण कोरोनाच्या ओमिक्रॉन वेरियंटचा धोका वाढल्याने केंद्र सरकारने याबाबतचा निर्णय पुढे ढकलला. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सामान्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने तूर्तास रोखला आहे. आता याची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली.

ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक पूर्ववत म्हणजे सामान्य करण्याचा निर्णय रोखला आहे. ही वाहतूक येत्या १५ डिसेंबरपासून सुरू होणार होती. यासंदर्भात केंद्र सरकारने गेल्या महिन्यात २६ तारखेला निर्णय जाहीर केला होता. ऑमिक्रॉनचा संसर्ग असलेल्या १४ देश वगळता सरकारने ही वाहतूक समान्य करण्याचा निर्णय घेतला होता.

नागरी विमान वाहतूक संचालनालयाने एक पत्रक जारी केले आहे. कोरोनाच्या नवीन वेरिएंटमुळे निर्माण झालेली जागतिक परिस्थिती पाहता आणि सर्व परिस्थितीचा जवळून आढावा घेतल्यानंतर आणि संबंधित भागधारकांशी चर्चा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सामान्य करण्याचा निर्णय तूर्त स्थगित करण्यात आला आहे. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील काळात आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू केली जाईल. याची तारीख निर्णय झाल्यावर कळवण्यात येईल, असे डीजीसीएने पत्रकात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या