19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयआझम खान यांची आमदारकी रद्द ?

आझम खान यांची आमदारकी रद्द ?

एकमत ऑनलाईन

लखनौ : रामपूर विधानसभा मतदार संघातून १० वेळा आमदार झालेले समाजवादी पक्षाचे (सपा) आमदार आणि माजी मंत्री आझम खान यांना द्वेषपूर्ण वक्तव्याचा आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने ३ वर्षे कारावास आणि २५ हजारांचा दंड ठोठावल्याने त्यांची आमदारकी जवळजवळ रद्द होण्याची शक्यता वाढली आहे.

रामपूरचे आमदार आझम खान यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रामपूरचे तत्कालीन जिल्हाधिका-यांविरोधात हे अशोभनीय वक्तव्य केले होते.या खटल्यावर २१ ऑक्टोबरला शेवटच्या सुनावणी दरम्यान आमदार खान हे न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता. खान यांनी प्रकरणांमध्ये २७ महिने तुरुंगवास भोगला आहे. द्वेषपूर्ण भाषणाचा आरोप सिद्ध झाल्यास १५३ अ अन्वये ३ वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे.

आझम खान यांच्याविरोधात या गुह्याव्यतिरिक्त ८० गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतांश गुन्हे भाजप सरकारच्या कार्यकाळातील आहेत. शेतक-यांच्या जमिनी बळकावण्यापासून ते पुस्तके चोरणे, मारहाण करणे, शेळ्या-म्हशी चोरण्यासारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. आझम खान यांनी जौहर विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.
२७ महिने होते तुरुंगात
सपा आमदार खान हे वेगवेगळ्या प्रकरणांत २७ महिन्यांपासून तुरुंगात होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १९ मे २०२२ ला अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर २० मे ला सकाळी त्यांची सीतापूर जिल्हा कारागृहातून सुटका झाली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या