27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयआझाद यांची ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ घोषीत

आझाद यांची ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ घोषीत

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव डेमोक्रेटिक आझाद पार्टी असे घोषित करण्यात आले आहे. जम्मूमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाव जाहीर केले आहे. आझाद यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला रामराम करत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज त्यांनी नव्या पक्षासह नावाची घोषणा केली आहे. पक्षाची घोषणा यापूर्वीच करायची होती. मात्र, नवरात्रीच्या शुभमूहूर्तावर याची घोषणा केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना आझाद म्हणाले की पक्षाची विचारधारा नावासारखी असेल आणि सर्व धर्मनिरपेक्ष लोक त्यात सामील होतील असे स्पष्ट केले आहे. आझाद यांनी यापूर्वीच पक्षाचा अजेंडा स्पष्ट केला असून यामध्ये जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे स्थानिक लोकांसाठी जमीन आणि नोक-यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवणे आदी मुद्यांचा समावेश आहे. मार्च २०२२ मध्ये गुलाम नबी आझाद यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

आमचे कोणाशीही वैर नाही
आपल्याकडे जनतेला देण्यासारखे खूप काही आहे आणि ज्यांच्याकडे जनतेला देण्यासारखे काही नाही ते शिव्या देतात. आमच्या पक्षाची विचारधारा ही गांधींची विचारधारा आहे. आमची धोरणे जात आणि धर्मावर चालणार नसल्याचेही आझाद म्हणाले. राजकारणात आपल्याला सर्व धर्मांबद्दल आदर असून आम्ही सर्व पक्षांचा आदर करतो. आमचे कोणाशीही राजकीय वैर नसल्याचे आझाद यांनी यावेळी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या