नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी या महिन्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच अरविंद केजरीवाल यांच्या आपने विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी पक्षाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी आम आदमी पक्षाने आज बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी या निर्णयाची घोषणा केली.