गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली असून, राज्यात सर्वत्र पूरस्थिती आहे. राज्यात जवळपास ३० जिल्ह्यांतील २९ लाख पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. या लोकांच्या घरात पाणी शिरले असून, पिकेही पाण्याखाली गेली आहेत.
पुरामुळे त्यांना छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात जवळपास ८ लोकांचा बळी गेला आहे. पुरामुळे भूस्खलनाच्या तडाख्यात १५९ जणांचा बळी गेला आहे, तर आतापर्यंत ३६ लोक बेपत्ता झाले आहेत.