26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयइंग्रज देशातून जाऊ नये हिच आरएसएसची होती भूमिका

इंग्रज देशातून जाऊ नये हिच आरएसएसची होती भूमिका

एकमत ऑनलाईन

रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आरएसएस जोरदार टीका केली आहे ते म्हणाले भाजपच्या विचारधारेमुळे देशाचे विभाजन झाले आणि भाजपच विभाजना साठी कारणीभूत आहे. ते म्हणाले, या लोकांना इंग्रज देशाबाहेर जावे असेही वाटत नव्हते. ते कधीही इंग्रजांवर टीका करत नाहीत. आजही ते गांधींवर टीका करत असतात. ते पाटणला रवाना होण्यापूर्वी रायपूरमध्ये पत्रकारांशी चर्चा करत होते.

फाळणी विभिषिका स्मृती दिनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, देशाच्या फाळणीची बीजे सावरकरांनी पेरली होती. हिंदू-मुस्लिम ही दोन राष्ट्रे आहेत हे त्यांनी मान्य केले. मोहम्मद अली जिना यांनी १९३७ मध्ये त्यांचा स्वीकार केला. द्विराष्ट्र सिद्धांत सावरकरांनी मांडला होता आणि त्याला जीनांनी पांिठबा दिला होता. हे लोक फुटीरतावादी असतात. देशाच्या स्वातंत्र्यात त्यांची भूमिका काय होती? १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली.
त्यावेळी त्यांच्या सर्व नेत्यांची विधाने पहा. १९४२ मध्ये त्यांचे श्यामा प्रसाद मुखर्जी म्हणाले की भारत छोडो आंदोलनात सामील होऊ नका. मुखर्जी व्हाईसरॉयला पत्र लिहून ते कसे दाबायचे हे विचारतात. इंग्रज जाऊ नयेत, असा प्रयत्न यातूनच झाला. ते कधीही इंग्रजांवर टीका करत नाहीत. ते गांधींवर टीका करतात. तुम्ही इंग्रजांच्या विरोधात एका शब्दात तरी टिका करतात का असा सवालही त्यांनी केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या