18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयइडी म्हणते शिसोदियांनी घेतली १०० कोटींची लाच

इडी म्हणते शिसोदियांनी घेतली १०० कोटींची लाच

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील मद्य धोरण ठरविण्यासाठी आम आदमी पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री मनिष शिसोदियांसह व्हिआयपींनी १०० कोटी रुपयांची लाच स्विकारल्याचा नवा दावा सक्त वसुली संचालनालयाने केल्याने शिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

दारु उत्पादकांच्या फायद्यासाठी मद्य धोरणातील नियमावली बदलविण्यासाठी आणि त्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी ३४ व्हीआयपींनी १४० मोबाईल फोन बदलल्याचा दावाही ईडीने केला आहे. या घडामोडीत ईडीने गुरुवारी दोघांना ताब्यात घेतले. यात फ्रान्सची कंपनी पर्नोड रेकॉर्डचे दिल्ली विभागीय प्रमुख बिनॉय बाबू आणि अरबिंदो फार्माचे प्रमुख पी सरथ चंद्र रेड्डी यांना कोर्टापुढे हजर करण्यात आले.

दोन महिने अगोदरच फुटली माहिती
दारू धोरण जाहिर होण्याच्या दोन महिने आधीच ३१ मे रोजी उत्पादक कंपन्यांना धोरणाची माहिती देण्यात आली. यासंबंधीचे पुरावे असल्याचा दावा ईडीने कोर्टामध्ये केला.

शिसोदिया यांची ९ तास चौकशी
या कथीत मद्य धोरण घोटाळ््यातल्या समन्स नंतर उपमुख्यमंत्री शिसोदिया १८ ऑक्टोबरला सीबीआयसमक्ष हजर झाले. सीबीआयच्या मुख्यालयात ९ तासांच्या चौकशी नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या