26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयइमरान हाश्मीवर अज्ञातांची दगडफेक

इमरान हाश्मीवर अज्ञातांची दगडफेक

एकमत ऑनलाईन

जम्मू : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी त्याच्या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सध्या जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आहे. दिवसभरातील चित्रीकरण आटोपून पहलगामच्या बाजारपेठेत तो फिरायला गेला होता. त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्यासह इतरांवर दगडफेक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इमरान हाश्मी चित्रपटाचे चित्रीकरण आटोपल्यानंतर इतर सहका-यांंसह पहलगामच्या बाजारपेठेत गेला होता. यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी इमरान हाश्मी आणि इतरांवर दगडफेक केली. या प्रकरणी पहलगाम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दगडफेक करणा-यांवर कलम १४७, १४८, ३७०, ३३६, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

इमरान हाश्मी त्याचा चित्रपट ग्राऊंड झिरो या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पहलगाममध्ये आला होता. तो चित्रपट बॉर्डर सिक्युरिटी फोर्सवर आधारित आहे. पहलगाम पूर्वी इमरान खान श्रीनगरमध्ये चित्रीकरण करत होता. श्रीनगरमध्ये त्याने १४ दिवस चित्रीकरण केले होते.

श्रीनगरच्या एसपी कॉलेजमध्ये चित्रीकरणदेखील करण्यात आले होते. तिथे चित्रीकरण संपल्यानंतर इमरान खानने त्याची वाट पाहणा-या चाहत्यांकडे पाहिलेदेखील नव्हते. अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. एका वेबसाईटने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. आम्ही अभिनेत्याला पाहायला आलो होतो, इमरान हाश्मीने त्यांच्याकडे पाहिलेदेखील नाही, असा दावा करण्यात आला होता. ग्राऊंड झिरो चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देऊस्कर करत आहेत. इमरान हाश्मीसोबत सई ताम्हणकर आणि जोया हुसेन त्या चित्रपटात अभिनय करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या