36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयउत्पल पर्रीकरांना डावलले

उत्पल पर्रीकरांना डावलले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली. माजी संरक्षण मंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचे नाव भाजपच्या उमेदवारांच्या यादीत नाही. उत्पल यांना पणजी मतदारसंघाची उमेदवारी हवी आहे. पण भाजपने बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, आपने उत्पल पर्रीकर यांना निवडणूक लढवण्याची ऑफर दिली.

केजरीवाल यांनी उत्पल पर्रीकरांचा उल्लेख करत एक ट्विट केले आहे. भाजपने पर्रीकर कुटुंबासोबत यूज अँड थ्रो (वापरा आणि फेक) धोरण अवलंबले आहे. मी मनोहर पर्रीकरांचा नेहमीच आदर केला आहे. उत्पल पर्रीकरांचे आपमध्ये स्वागत आहे, त्यांना आम्ही निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी देऊ, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

त्यातच मनोहर पर्रीकरांचे कुटुंब हे आमचे कुटुंब आहे. उत्पल पर्रीकर यांच्याशी चर्चा झाली आहे. आम्ही त्यांना पणजी सोडून इतर दोन मतदारसंघांचे पर्याय दिले आहेत. त्यांनी ते पर्याय नाकारले आहेत. आता दुस-या पर्यायांवर त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. उत्पल पर्रीकर यांचे मन वळण्यात आम्हाला यश येईल, असा विश्वास गोवा भाजपचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

गोव्यात भाजपने दिला ६ आमदारांना धक्का
भाजपने आज गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना संकेलीममधून उमेदवारी दिली, तर भाजपने ६ आमदारांचे तिकीट कापले. पक्षाने जाहीर केलेल्या ३४ उमेदवारांपैकी ९ जण ख्रिश्चन समाजाचे आहेत, तर तीन जागांवर अनुसूचित जमातीच्या नेत्यांना उमेदवारी दिली. मात्र, ६ आमदारांना धक्का देत ६ा मतदारसंघातून पक्षाने नवीन उमेदवार उभे केले आहेत, असे पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले.

उत्तराखंडमधील यादीही जाहीर
भाजपने उत्तराखंडमध्ये पहिली यादी जाहीर केली. या यादीत ५९ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे खटिमा येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राज्यातील ७० जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी ही १० मार्चला होईल.

ग्

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या