16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयउपहार पोर्टलच्या माध्यमातून भेटवस्तूंचा होणार लिलाव

उपहार पोर्टलच्या माध्यमातून भेटवस्तूंचा होणार लिलाव

एकमत ऑनलाईन

हिस्सार : राज्यात लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी सामुहिक निधी गोळा करता यावा यासाठी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपल्याला मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सीएम उपहार पोर्टल लॉन्च करणार आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून देशभरातील लोक भेटवस्तूंसाठी बोली लावू शकतील. मुख्यमत्र्यांना मिळालेल्या भेटवस्तूंवर सर्वाधिक बोली लावणा-याला दिल्या जातील.

बोलीमध्ये पारदर्शकता
या उपहार पोर्टल द्वारे सर्व महागड्या भेटवस्तूंचा ऑनलाइन लिलाव पारदर्शक पद्धतीने होणार आहे. भेटवस्तूंच्या लिलावात मिळालेली रक्कम हरियाणातील नागरिकांच्या कल्याणासाठी वापरली जाईल.

जिह्यांची कामगिरी कळणार
हरियाणा दिनाच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री खट्टर जनतेला सीएम डॅशबोर्डचे लोकार्पण करतील. त्यामुळे एका क्लिकवर जिह्याच्या कामगिरीचा आढावा घेता येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या