22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeराष्ट्रीयएमबीबीएसचे शिक्षण आता हिंदीतून!

एमबीबीएसचे शिक्षण आता हिंदीतून!

एकमत ऑनलाईन

पर्यायी माध्यमाचा विचार, ट्रान्सलेशनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
इंदूर : देशातील सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी भाषा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मध्य प्रदेशातील एमबीबीएस अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठीची पर्यायी माध्यम बनणार आहे. मागील अनेक वर्षांपासून यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून यावर्षी सप्टेंबर अखेरीस सुरू होणा-या नवीन शैक्षणिक वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी हिंदी भाषा वापरण्यास सुरुवात होऊ शकते. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या एका अधिका-याने रविवारी ही माहिती दिली.

नवीन शैक्षणिक सत्रात देशातील प्रमुख हिंदी भाषिक प्रांतातील खासगी आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रथम वर्षाच्या एकूण ४ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी तसेच हिंदी पुस्तकांमध्ये अभ्यास करण्याचा पर्याय मिळू शकेल. त्याचवेळी संबंधित समितीचे सदस्य आणि फिजियोलॉजीचे माजी सहयोगी प्राध्यापक डॉ. मनोहर भंडारी यांनी सांगितले की, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे ६० ते ७० टक्के विद्यार्थी हे हिंदी माध्यमातील आहेत. मात्र, इंग्रजी माध्यमातून पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना पहिल्याच वर्षात अडचणींचा सामना करावा लागतो.

यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या एका अधिका-याने सांगितले की, राज्य सरकार तीन प्रस्थापित इंग्रजी लेखकांच्या एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाच्या पुस्तकांचे हिंदीत रूपांतर करण्याचे काम पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असून ही पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा चेहरामोहरा बदलू शकतो, असेही त्यांनी म्हटले. खाजगी प्रकाशकांची ही पुस्तके शरीर रचनाशास्त्र (एनाटॉमी), शरीर क्रिया शास्त्र (फिजियोलॉजी) आणि जैवरसायनशास्त्र (बायोकेमिस्ट्री) या विषयांशी संबंधित आहेत. ही पुस्तके छापण्यापूर्वी ५५ तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने विविध पातळ््यांवर तपासली जाणार आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या