18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयऑनलाईन मागवला ड्रोन, हाती आला बटाटा

ऑनलाईन मागवला ड्रोन, हाती आला बटाटा

एकमत ऑनलाईन

नालंदा : ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर मागवलेली वस्तू ऑनलाइन वेगळी आणि प्रत्यक्षात वेगळी असणे, त्यात काही तरी त्रुटी असणे किंवा मागवली एखादी वस्तू आणि आले काही भलतेच. हे सर्वकाही नवं नाही. नालंदा येथील एका तरूणाने ड्रोन कॅमेरा मागवला होता. पण, त्याच्या हाती बटाटे आले.

नालंदामधील चेतन कुमार या तरूणाने मिशो या ऑनलाईन शॉपिंग कंपनीवरून ‘डिजेआय’ कंपनीचा ड्रोन कॅमेरा मागवला होता. ज्यावेळी तो पार्सल घेऊन ते फोडून पाहिले तर त्यात बटाटे होते. हे पार्सल पाहुनच चेतनला शंका आली. ड्रोनची साईज आणि आलेल्या बॉक्सची साईज यात त्याला फरक जाणवला. तसेच, बॉक्स हातात घेतल्यावरच त्याला ते कमी वजनाचे असल्याचे लक्षात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या