18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयकर्ज माफ करण्यासाठी नग्नपूजा

कर्ज माफ करण्यासाठी नग्नपूजा

एकमत ऑनलाईन

बेंगळूरू : कर्नाटकमध्ये एक भयानक घटना घडली आहे. ती घटना जेव्हा सोशल मीडियावरुन व्हायरल झाली तेव्हा मात्र त्याचे मोठे पडसाद उमटले आहेत. कर्नाटकमध्ये पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार तीन लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तीन जणांना अटकही करण्यात आली आहे.

वडिलांचे कर्ज माफ व्हावे म्हणून त्या मुलाला तीन जणांनी पूजा करण्यास भाग पाडल्याचे दिसून आले आहे. कर्नाटकमधील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. आपण अजुनही कोणत्या काळात राहतो आहोत, जगतो आहोत आणि कोणत्या अमानुष पद्धतींना बळी पडतो आहोत असा प्रश्न नेटक-यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या