28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयकुत्र्याला फरफटले

कुत्र्याला फरफटले

एकमत ऑनलाईन

जोधपूर : अनेकदा मुक्या प्राणी अत्याचाराच्या घटनांनी मन सुन्न होऊन जाते. अशीच एक मन सुन्न करणारी घटना पुढे आली आहे. ही घटना राजस्थान राज्यातील जोधपूर शहरातील असल्याचे समजते. या घटनेत कुत्र्याचा अमानूष छळ करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील कारच्या मागे धावणारा कुत्रा फारच थकलेला आहे.

कार चालवणा-या इसमाचे नाव डॉ. रजनीश गलवा असे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओ असे दिसते आहे की एक कार रस्त्यावरुन धावत आहे. त्या कारच्या मागे कुत्रा हा पळताना दिसत आहे. पण तुम्ही जर का हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यावर लक्षात येते की कुत्रा कारच्या मागे पळत नाही तर, त्याच्या गळ्यात साखळी बांधली आहे. ही साखळी कारमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या हातात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या