18.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeक्रीडाक्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघ चितपट : कामकाजावर निर्बंध, अतिरिक्त सचिवही निलंबित

क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघ चितपट : कामकाजावर निर्बंध, अतिरिक्त सचिवही निलंबित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्त्व करणा-या महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघावरच लैंगिक छळाचा आरोप केल्याने देशाच्या प्रतिष्ठेची सक्तरे वेशील टांगली गेल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालय शनिवारी अ‍ॅक्शन मोडमध्ये आले.

कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर आक्रमक झालेल्या मंत्रालयाने कुस्ती महासंघाला चितपट देत चौकशीसाठी सात सदस्यीय समितीची स्थापना केली. सोबतच चौकशी पूर्ण होत नाही तोवर कुस्ती महासंघाच्या कामकाजावर निर्बंध घालत महासंघाच्या अतिरिक्त सचिवांवर निलंबनाचे आसूड ओढत त्यांना आस्मान दाखविले.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह आणि त्यांचे चेले अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करतात, असा आरोप करीत कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानाला आंदोलनाचा आखाडा बनविले होते.

त्यामुळे देशाच्या प्रतिष्ठेची लक्तरे वेशिला टांगली गेली. देशाच्या कुस्ती इतिहासात प्रथमच अशी लाजीरवाणी वेळ आल्याने क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मध्यस्थी करीत कुस्तीपटूंची समजूत काढण्यात यश मिळविले. त्याच्या अगदी काही तासांनंतर अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेले क्रीडा मंत्री ठाकूर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सात सदस्यांची समिती नेमली.

कुस्तीमहासंघाच्या कामकाजावर निर्बंध
माजी मुष्टीयोद्धी मेरी कोम आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांचा समावेश असलेल्या या सात सदस्यीय चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत मंत्रालयाने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अधिकार गोठवून टाकत भारतीय कुस्ती महासंघाच्या कामकाजावर निर्बंध लादले. यासोबतच क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाचे अतिरिक्त सचिव विनोद तोमर यांनाही तात्काळ निलंबित केले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या