गांधीनगर : गुजरातमध्ये गत १० तारखेला रामनवमीच्या दिवशी उसळलेली धार्मिक दंगल अद्यापही धगधगत आहे. दंगलखोरांनी काल रात्री अनेक हिंमतनगरमधील अनेक घरांवर हल्ला केला. पोलिसांनी दोन्ही समुदायांना शांततेचे आवाहन केले. पण त्यानंतरही दंगलखोरांनी एका विशिष्ट समुदायाच्या घरांवर पेट्रोल बॉम्ब व दगडफेक केली. यामुळे येथील अनेक कुटूंब आपली घरेदारे सोडून अन्यत्र पलायन करत आहेत. रामनवमीच्या दिवशी गुजरातच्या हिंमतनगर, खंबात व द्वारका या ३ जिल्ह्यांतील दोन समुदायांत दंगल झाली होती. त्यानंतर या ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली. पण हिंमतनगरमध्ये पुन्हा दंगल उसरळली.