23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयगोगोईंनी शिष्यवृत्तीसाठी दिला पगार

गोगोईंनी शिष्यवृत्तीसाठी दिला पगार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. मात्र त्यांनी खासदार म्हणून कमावलेला संपूर्ण पगार दान केला आहे. त्यांनी राज्यसभेचा संपूर्ण पगार कायद्याचा अभ्यास करणा-­या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी उपलब्ध करून दिला आहे. आसाम किंवा देशभरातील इतर कोणत्याही राज्यातील ५ वर्षांच्या कायद्याची पदवी घेतलेला या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकतो.

रंजन गोगोई यांना मार्च २०२० मध्ये राज्यसभेवर नामनिर्देशित करण्यात आले होते. मात्र नियुक्त झाल्यापासून गोगोई यांनी राज्यसभेने दिलेले वेतन आणि भत्त्यांमधून एक पैसाही घेतला नाही. गोगोई यांनी आतापर्यंत न घेतलेले पैसे आणि भत्ते यातून शिष्यवृत्ती निधी तयार करण्यात आला आहे.

माजी सरन्यायाधीश गोगोई यांनी सांगितले की, या पैशाचा विद्यार्थ्यांसाठी, विशेषत: कायद्याचा अभ्यास करणा-यांसाठी चांगला उपयोग झाला पाहिजे. मला खात्री आहे की मला गेल्या दोन वर्षांपासून मिळणारे भत्ते आणि पगार शिष्यवृत्तीसाठी पुरेसे असतील. किमान १० ते १५ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निधी देता येईल, असेही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या