24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयमहागाईत ४०० पटीने वाढ, २० वर्षातील मोठी तफावत

महागाईत ४०० पटीने वाढ, २० वर्षातील मोठी तफावत

एकमत ऑनलाईन

मुंबई : दैनंदिन वस्तूंचे भाव बघता महागाई ही सात पटीने वाढली असल्याचे लक्षात येते. मागल्या आठ महिन्यांपासून रिजर्व बँकेची अप्पर लिमिट ६ पटीने वाढली आहे. महागाईमुळे मनी व्हॅल्यू कमी होते अर्थात यासह क्रयशक्ती (पर्चेसिंग व्हॅल्यू) मध्येही घट होते.

महागाईला अर्थशास्त्रातला असा टॅक्स मानला जातो जो तुम्हाला दिसत नसतो, मात्र गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत याचा सगळ्यांनाच फटका बसत असतो. एका रिपोर्टनुसार आजच्या आणि २० वर्षाआधीच्या दरांची तुलना करण्यासाठी सीएमआयईईच्या हिस्टॉरिकल डेटाची मदत घेण्यात आली.

यावरून २० वर्षाआधी वस्तूंचे जे दर होते ते आताच्या तुलनेत ४०० पटीने वाढले आहेत. दाळी, पेट्रोल आणि पेट्रोलियम उत्पादनांतील वाढलेल्या दरांचा विचार केला तर आज महागाई शिखराला जाऊन पोहोचली आहे असे म्हणायला हरकत नाही.

अन्न – २१ वर्षांत गैर बासमती तांदळाचे दर ४२३ पटींनी वाढले आहे. २००१ मध्ये या तांदळाची किंमत ५.२७ रुपये किलो होती आता ती वाढून २७.५५ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. अर्थात वीस वर्षाआधी हजार रुपयांत जेवढे तांदूळ घेणे शक्य होते त्याच्या निम्मे तांदूळ घेणेही आज शक्य नाही. तसेच बारामती तांदळाचे दर वीस वर्षांत ६२९ रुपयांवरून ६१०७ रुपये झाली आहे. गव्हाची किंमत २१ वर्षात १६६ पटीने वाढली आहे. याचप्रकारे ज्वारी आणि बाजरीचे दरही वाढले आहे.

दाळींचे दर – वीस वर्षाआधी १८०० रुपये क्विंटल रुपये असणा-या दाळीचा आताचा दर तब्बल ५८२० रुपये आहे. चण्याच्या किमतीतही वाढ झाली आहे.

पेट्रोलियम प्रोडक्ट – २००२-३ दरम्यान पेट्रोलची किंमत २९.५ रुपये लीटर होती. जी आता ९८ रुपयांवर पोहोचली आहे. याचप्रकारे डिझेलचा भावही १९ रुपयांवरून तब्बल ८७.५ रुपयांवर पोहोचला आहे.

सोने-चांदी – २००४ ते २००५ च्या दरम्यान मुंबईत सोन्या-चांदीचे दर १० ग्रामसाठी सहा हजार रुपये एवढे होते. आताची किंमत या दराच्या ७०० पटीने जास्त आहे. आज दहा ग्राम सोन्याचे दर अठ्ठेचाळीस हजारांत जाऊन पोहोचले आहेत.

वाढत्या महागाईमुळे पर्चेसिंग पावर कमी झाली असली तरी मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट आणि गवर्नमेंट सेक्टरच्या पगारांत वाढ झाली आहे. भारतातील दरडोई उत्पन्न आधी १८,६६७ रुपये होते. आता दीड लाखांच्या घरात जाऊन पोहोचले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या