24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयचक्क पापडावरून भांडण, व-हाडींना बेदम मारहाण

चक्क पापडावरून भांडण, व-हाडींना बेदम मारहाण

एकमत ऑनलाईन

अलप्पुझा : लग्न समारंभात लहान मोठ्या गोष्टींनी भांडणे झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण एका पापडावरून देशातील सर्वात साक्षर मानल्या जाणा-या केरळमध्ये भांडणे होऊन ६ जण जखमीही झाले. वराच्या कुटुंबातील काही सदस्यांनी जास्तीचे ‘पापड’ मागितले मात्र त्यांना नकार देण्यात आला त्यानंतर ही हाणामारी सुरू झाली.

केरळमधील अलप्पुझा येथून समोर आला आहे. मुत्तोम येथील एका विवाह मंडपात लग्नात पापडावरून मोठा वाद झाला. यात नवरी आणि नवरदेवाकडील लोकांमध्ये जोरदार भांडण झाले.

यासंदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक एकमेकांना चप्पलने मारताना दिसत आहेत. एकमेकांना मारण्यासाठी त्यांनी खुर्च्या आणि टेबलचाही वापर केला. याप्रकरणी अलप्पुझा पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या घटनेत वराच्या काही मित्रांनी आणखी पापड मागितले होते, जे देण्यास केटरिंग एजन्सीच्या कर्मचा-यांनी नकार दिला. यावरुनच हे भांडण सुरू झाल्याचे अधिका-यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या