19.6 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeराष्ट्रीयचीनमध्ये कोरोनाचा कहर, मृत्यूची संख्या दडवली जातेय

चीनमध्ये कोरोनाचा कहर, मृत्यूची संख्या दडवली जातेय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. चीनकडून रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा लपविला जात असल्याचा संशय इतर देशांना आहे. या सगळ््या पातळीवर भारत किती सुरक्षित आहे, हा प्रश्न पडत आहे.

यासंदर्भात कोविड टीमच्या एक्स्पर्टने महत्त्वाची माहिती दिली. कोविड वर्किंग ग्रुप एनटीएजीआयचे प्रमुख एन. के. अरोरा यांनी सांगितले की, सध्या तरी घाबरुन जाण्याची गरज नाही. असे असले तरी चीनच्या परिस्थितीवर नजर ठेवावी लागेल. भारतात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. त्याचे कारण व्हॅक्सिनेशन. देशात जवळपास सर्व ज्येष्ठांचे लसीकरण झालेले आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरस्ािंह सुक्खू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच हिमाचलच्या १४ व्या विधानसभेचे पहिले सत्र रद्द करण्यात आलेले असल्याचे अरोरा यांनी सांगितले. सध्या कोरिया, जपान, अमेरिका आणि चीनमध्ये वाढती कोरोनाची प्रकरणे पाहता केंद्राने एक मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. या संदर्भात केंद्राने राज्यांना एक पत्र लिहिले असून यामध्ये जिनोम सिक्वेन्सिंगसाठी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे अहवाल पाठवायला सांगितले आहेत. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी एनसीडीसी आणि आयसीएमआरलादेखील याबाबत पत्र लिहिले आहे. यामध्येदेखील जिनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या