24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयचौकशीनंतर सोनिया गांधी ईडी कार्यालयातून निघाल्या; तीन दिवस ११ तास चौकशी

चौकशीनंतर सोनिया गांधी ईडी कार्यालयातून निघाल्या; तीन दिवस ११ तास चौकशी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी आजची चौकशी संपली आहे. ईडी अधिका-यानी सोनिया गांधी यांची जवळपास तीन तास चौकशी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील चौकशीबाबत सोनिया गांधी यांना नवीन समन्स देण्यात आले नाही. ईडीने सोनिया गांधी यांची तीन दिवस ११ तास चौकशी केली आहे.

ईडी अधिका-यांनी मंगळवारी सोनिया गांधी यांची जवळपास सहा तास चौकशी केली होती. त्यानंतर आज पुन्हा चौकशीसाठी येण्यास सांगितले होते. त्याआधी २१ जुलै रोजीदेखील ईडीने सोनिया गांधी यांची दोन तास चौकशी केली होती. नॅशनल हेराल्डची मालकी असणा-या ‘यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या व्यवहारात आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याची चौकशी सध्या सुरू आहे.

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन करून सोनिया गांधी यांची चौकशी करण्यात आली. ईडी अधिका-यांनी ‘यंग इंडिया’ आणि काँग्रेसमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न विचारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याआधी ईडी अधिका-यांनी राहुल गांधी यांची पाच दिवस ५० तास चौकशी केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या