23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयजॅकलिनवर प्रश्नांचा भडिमार

जॅकलिनवर प्रश्नांचा भडिमार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. २०० कोटींच्या घोटाळ््या प्रकरणी जॅकलिन आज दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली होती. दिल्ली पोलिसांनी २०० कोटी रुपयांच्या घोटाळ््या प्रकरणी तिला किमान १०० प्रश्नांची यादी दिली आहे. सकाळी साडेअकरा वाजल्यापासून ही चौकशी सुरू आहे.

दिल्ली पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिसला आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावला आहे. तिस-यांंदा समन्स बजावल्यानंतर आज ती आपल्या वकिलांसोबत दिल्ली पोलिसांसमोर हजर झाली. यापूर्वी २९ ऑगस्ट आणि १२ सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला समन्स बजावला होता. पण दोन्ही वेळी ती चौकशीसाठी हजर राहू शकली नाही. आज सकाळी ११ च्या सुमारास जॅकलिन तिच्या वकिलांच्या पथकासह आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाली. यावेळी दिल्ली पोलिसांकडून तिला एक लांबलचक प्रश्नांची यादी देण्यात आली. या यादीत किमान १०० प्रश्नांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये सुकेश चंद्रशेखरसोबतचे तिचे नातेसंबंध आणि त्याच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू याबाबतचे विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या