26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयटीव्ही अभिनेत्रीची दहशतवाद्यांकडून हत्या

टीव्ही अभिनेत्रीची दहशतवाद्यांकडून हत्या

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील टीव्ही अभिनेत्री अमरिन भट हिची दहशतवाद्यांनी गोळी मारुन हत्या केली आहे. दहशतवाद्यांनी अमरिनच्या घरात घुसून तिची हत्या केली. बडगाममधील छदोरामध्ये ही घटना घडल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. दहशतवाद्यांमध्ये अमरिन भटचा मृत्यू झाला तर तिचा पुतण्या जखमी झाला आहे.

जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांनी अमरिन भटवर गोळीबार केला. अमरिन भट हिच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे.

बडगाममधील छडोरा येथील अमरिन भटच्या घरात दहशतवादी घुसले आणि त्यांनी गोळीबार केला. अमरिन भट हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अमरिन भट हिचा १० वर्षीय नातू जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अमरिन भटच्या पुतण्याच्या खांद्याला गोळी लागल्याने जखम झाल्याची माहिती आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या