28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीय‘तुलसी’ गाव ‘युट्युबर’साठी हब; ग्रामस्थांची कंटेन्ट निर्मितीस मदत

‘तुलसी’ गाव ‘युट्युबर’साठी हब; ग्रामस्थांची कंटेन्ट निर्मितीस मदत

एकमत ऑनलाईन

रायपूर : जगाला डिजिटल विश्वाने जबरदस्त भुरळ घातली आहे. भारतातील ग्रामीण भागातील तरुणांना देखील या डिजिटल क्षेत्राने पछाडले. पण हे पछाडणे चांगल्या अर्थाने आहे, कारण प्रातिनिधीक उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास छत्तीसगडमधील तुलसी नावाचे गाव तर युट्यूबर्सचे हब बनले.
या गावातील लोक विशेषत: तरुण वर्ग जगण्यासाठी पारंपारिक काम धंदा करण्याऐवजी कन्टेंट निर्मिती करत आहेत. हा व्हिडिओ कन्टेंट सोशल मीडियावर शेअर करत नवे करियर निर्माण केले आहे.

या गावातील लोकांचे सुमारे ४० युट्यूब चॅनल आहेत. मनोरंजनाशिवाय हे युट्युबर्स शैक्षणिक बाबींवरही व्हिडिओ तयार करत आहेत. गावात हे युट्यूब कल्चर सुरुवातीला दोन मित्रांनी सुरु केले. ज्ञानेंद्र शुक्ला आणि जय वर्मा ही या मित्रांची नावे आहेत. पण काही दिवसातच त्यांना फॉलो करत संपूर्ण तुलसी गावच या व्यवसायात उतरले. विशेष म्हणजे शुक्लाने आपले स्टेट बॅँकेमधील काम तर वर्माने आपली शिक्षकाची नोकरी सोडली. या दोघांनी मिळून सध्या २५० व्हिडिओ तयार केले असून त्यांच्या चॅनेलला १.१५ लाख सबस्क्रायबर आहेत.

सुरुवातीला त्यांना हे व्हिडिओ तयार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कॅमे-यासमोर येताना लाज वाटणे तसेच सार्वजनिक ठिकाणी अभिनय करताना अवघडल्यासारखे होत असल्याचे या दोघांनी सांगितले. पण नंतर ही सर्व भीती गळून पडली आणि आता गावातील जवळपास सर्वच लोक आता युट्यूबसाठी व्हिडिओ तयार करत आहेत आणि पैसे कमवत आहेत.

जय वर्मा म्हणाला, आम्ही गावातील रामलीलाच्या कार्यक्रमातून बरंच काही शिकलो. आमचे गाव ३००० लोकांचे आहे. यांपैकी ४० टक्के लोक हे युट्यूबशी कनेक्टेड आहेत. युट्यूबवर काम सुरु केल्यानंतर लोक हळूहळू टिकटॉक आणि आता रिल्सवर काम करत आहेत. मी पार्टटाईम शिक्षक म्हणून काम करत होतो. त्यावेळी मला महिन्याला १२,००० ते १५,००० पगार मिळत होता. पण आता ३०,००० ते ३५,००० हजार रुपये महिन्याला मिळत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या