27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीय... तेव्हापासून माझी आई एकेरी हाक मारत नाही : मोदी

… तेव्हापासून माझी आई एकेरी हाक मारत नाही : मोदी

एकमत ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचा आज १०० वा वाढदिवस. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईबद्दल एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये मोदी म्हणतात, आई हा फक्त एक शब्द नाही, तर अनेक भावनांचा मिलाप आहे. आज १८ जून रोजी, माझी आई हिराबा वयाच्या १०० व्या वर्षात प्रवेश करत आहे. या खास दिवशी मी माझ्या भावना, आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करत आहे. या पोस्टच्या माध्यमातून आपल्या आईबद्दलचे काही किस्से, आईच्या काही आठवणीही सांगितल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या लेखात आपली आई कशा पद्धतीने संबोधते, याबद्दल सांगितले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, माझी आई माझ्याशी गुजरातीतच बोलते. गुजरातीमध्ये एकेरी हाक मारताना ‘तू’ म्हणतात आणि तुम्हाला म्हणायचे असल्यास ‘तमे’ म्हणतात. मी जेवढे दिवस घरी राहिलो, तेवढे दिवस मला आई ‘तू’ म्हणायची. पण जेव्हा मी घर सोडले, माझा मार्ग बदलला. त्यानंतर तिने कधीही मला एकेरी हाक मारली नाही. आजही ती मला ‘तमे’ असं म्हणते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या