22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत ८ रुपयांनी घट

दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत ८ रुपयांनी घट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना दिल्लीमध्ये मात्र आज पेट्रोलच्या किमती थेट ८ रुपये प्रतिलिटर इतक्या कमी झाल्या. केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील व्हॅट थेट १०.६० टक्क्यांनी घटवत १९.४० टक्क्यांवर आणला आहे. त्यामुळे आता पेट्रोल ८ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

दिल्लीमध्ये सध्या पेट्रोल १०३.९७ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ८६.६७ रुपये प्रतिलिटर या दराने विकले जात आहे. नवीन दरानूसार आज मध्यरात्रीपासून दिल्लीमध्ये पेट्रोल ८ रुपयांनी स्वस्त म्हणजेच ९५.९७ रुपये प्रतिलिटर या दराने मिळणार आहे. दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी ४ रुपये आणि ८ रुपये प्रतिलिटर इतकी कमी केली होती. त्यामुळे काही प्रमाणात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर झाल्या होत्या. आता दिल्ली सरकारच्या निर्णयामुळे दिल्लीकरांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
तेल उत्पादनवरही ओमिक्रॉनचे सावट?

मोठ्या शहरांचा विचार करता देशात सर्वाधिक इंधन दर मुंबईत आहेत. जागतिक स्तरावर विचार करता कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे इंधनाच्या मागणीवर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता या संकटाचा सामना कसा करायचा, यावरही जागतिक स्तरावरील तेल उत्पादक चर्चा करत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या