26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीत ३ चिनी नागरिक अटकेत

दिल्लीत ३ चिनी नागरिक अटकेत

एकमत ऑनलाईन

स्पेशल टास्क फोर्सची कारवाई
नवी दिल्ली : दिल्लीतील नोएडा येथून तीन चीनी नागरिकांना स्पेशल टास्क फोर्सकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट भारतीय आधार कार्डही जप्त केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तिन्ही आरोपी नेपाळ सीमेवर अटक करण्यात आलेल्या चिनी नागरिक आणि त्यांचा मित्र नटवरलाल यांच्या जवळचे असल्याचा संशय आहे. चेन जुनफेंग, लिऊ पेंगफेई आणि झांग किआओ असे अटक करण्यात आलेल्या चिनी नागरिकांची नावे असून ते हेरगिरी करत भारतीय नागरिकांचा डेटा चीनला पाठवत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात आत्तापर्यंत १७ लोकांना पकडण्यात आले आहे. ११ जून रोजी पकडण्यात आलेल्या लू लांग आणि युन हेलांग या दोघांच्या सखोल चौकशीनंतर या प्रकरणाचा खुलासा झाला होता. हे दोघेही अवैध पासपोर्ट आणि व्हिसाद्वारे भारतात प्रवेश करत होते. त्यानंतर १३ जूनला पोलिसांनी सुफाई आणि त्याची प्रेयसी पेटेख रेनुआला अटक केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये ते भारतीयांची माहिती चीनमध्ये पाठवत असल्याची माहिती समोर आली होती. पण ते ही माहिती कोणत्या कारणासाठी चीनमध्ये पाठवत आहेत याची माहिती समोर आली नाही.

अटक करण्यात आलेल्या आरोपींचे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंध आहे का हे तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती, कायदा व सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले. दोघांना बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांना पुराव्यांच्या जोरावर अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या या तीन नागरिकांचे नटवरलाल आणि त्याच्या टोळीशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. ते चलन हस्तांतरित करून चीनला पाठवत होते. यावेळी त्यांनी भारतीय बनावटीचे आधार कार्डही सोबत ठेवले होते. त्याचबरोबर अटक करण्यात आलेल्या एकाच्या मैत्रिणीकडे बिटकॉईन मिळाले आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास चालू आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या