27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयदुस-या लग्नासाठी आता घ्यावी लागणार परवानगी

दुस-या लग्नासाठी आता घ्यावी लागणार परवानगी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सरकारी कर्मचा-यांच्या दुस-या लग्नासंदर्भात राज्य सरकारने काही नियम बनवले आहेत. बिहार सरकारमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचा-यांना आता दुसरे लग्न करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.

दुस-या लग्नाससाठी ‘पर्सनल लॉ’कडून परवानगी मिळाली असेल पण सरकारने नाकारली असेल तरी हे लग्न वैध मानण्यात येणार नाही. नितीश सरकारने जारी केलेल्या आदेशांनुसार, पती किंवा पत्नी जिवंत असताना कोणी दुसरा विवाह केला तर तो ग्रा धरला जाणार नाही.

तसेच, या संबंधातून जन्माला येणा-या मुलाला अनुकंपा आधारित नोकरीसाठी दावेदारही मानण्यात येणार नाही. सरकारी कर्मचा-याचे सेवाकाळात निधन झाल्यास त्यांच्या जागेवर दुस-या विवाहातून जन्माला येणा-या अपत्याला नोकरी मिळणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

सरकारी अधिका-यांनी वा कर्मचा-यांनी दुसरा विवाह करण्यासाठी परवानगी घेतली तरच पत्नी किंवा मुले अनुकंपा योजनेवर आधारित नोकरीसाठी हकदार बनू शकतील.

कौटुंबिक समस्या दूर होण्यास मदत
सरकारी स्तरावरुन काढण्यात आलेल्या या आदेशांचे पालन करण्े बंधनकारक आहे. पहिली पत्नी जिवंत असताना जर दुस-या पत्नीच्या नियुक्तीची वेळ आल्यास पहिल्या पत्नीकडून शपथपत्र द्यावे लागेल. नितीश सरकारच्या या निर्णयामुळे कौटुंबिक स्तरावरील अनेक समस्या दूर होतील असा अंदाज बांधला जात आहे.
———————–

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या