23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयदेशात पुन्हा रुग्णसंख्या वाढतेय

देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढतेय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने चौथी लाट येणार की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. दिल्ली, हरियाणा आणि गुजरात या राज्यांत मागील एक आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत सरासरी वाढ झाली आहे. दुसरीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. ही संख्या मागील दोन वर्षातील सर्वात कमी आहे. गेल्या २४ तासांत देशात १०५४ कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर २९ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत शनिवारी कोरोनाच्या १६० रुग्णांची नोंद झाली तर पॉझिटिव्हीटी दर १.५५ टक्के इतका झाला आहे. एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब आहे. दिल्लीत रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे. इथे शुक्रवारी १४६ रुग्णांची नोंद झाली होती, तर पॉझिटिव्हीटी दर हा १.३९ इतका होता. गुरुवारी दिल्लीत १७६ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. जी आधीच्या दिवसाच्या तुलनेत ४० टक्के जास्त होती. याच दिवशी पॉझिटिव्हीटी दर हा १.६८ इतका होता. यादरम्यान, कुणाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब होती. बुधवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला, तसेच १२६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. दिल्लीत आतापर्यंत १८,६६,१०२ इतक्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर २६,१५६ बाधितांचा मृत्यू झाला.

गुजरातमध्येही धोका
गुजरातमध्ये शनिवारी कोरोनाच्या ३४ नवीन रुग्णांची नोंद झाली. ही मागील तीन आठवड्यातील सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे. गुरुवारी तर फक्त ८ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. शनिवारी ही संख्या वाढली. १३ मार्चनंतर सर्वात जास्त रुग्ण शनिवारीच आढळले. यामुळे आठवड्याची सरासरी १५ झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही १२,२४,०२५ इतकी झाली आहे.

हरियाणातही वाढतेय रुग्णसंख्या
हरियाणात गेल्या १० दिवसांत दररोज येणा-या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. तसेच सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ पाहायला मिळत आहे. गुरुग्रामध्ये २७० कोरोनाबाधित आहेत. फरिदाबादमध्ये ३४ तर सोनीपतमध्ये ८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ३० मार्चला इथे ४१ रुग्ण आढळले होते, तर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २९० होते, तर शनिवारी ८७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामुळे अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या वाढून ३६३ इतकी झाली आहे.

केंद्राकडून इशारा
केंद्राने केरळ, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोरम येथील राज्य सरकारला पत्र पाठवून इशारा दिला आहे. यात आरोग्य सचिवांनी राज्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रात म्हटले आहे की, जिथे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे, तिथे नियमित लक्ष ठेवावे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या