27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयदोन हजार रुपयांची नोट बंद होणार नाही

दोन हजार रुपयांची नोट बंद होणार नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोटबंदीनंतर चलनात वाढ व्हावी म्हणून २ हजार रुपयांची नोट काढली होती. मात्र सध्या त्यांची संख्या कमी झाल्यामुळे त्या बंद केल्या जाणार का? अशी चर्चा सुरु होती. मात्र केंद्र सरकारने राज्यसभेत उत्त्तर देताना ही नोट बंद होणार नाही मात्र लोकांचे व्यवहार आणि मागणी लक्षात घेऊन नोटांची उपलब्धता वाढवली किंवा कमी केली जाते, असे सांगून अफवांवर पडदा टाकला आहे.

२ हजार रुपयांच्या नोटांची संख्या चलनात कमी झाल्यामुळे आता त्या नोटा बंद होणार असे लोकांना वाटत आहे, परंतु तसे नाही.नोव्हेंबरमध्ये बाजारात चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांची संख्या २ हजार २३३ दशलक्ष नोटांवर आली आहे. एकूण नोटांच्या ही संख्या १.७५ टक्के आहे, म्हणजेच आता बाजारात २ हजार रुपयांच्या नोटांमध्ये घट झाली आहे, मार्च २०१८ मध्ये ही संख्या ३ हजार ३६३ कोटी होती. नोव्हेंबर महिन्यात नोटांची संख्या का कमी झाली या मागचे कारण सरकारने सांगितले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, विशेष मूल्यांच्या नोटा छापण्याचा निर्णय सरकार आरबीआयच्या सल्ल्याने घेत आहे. याशिवाय लोकांचे व्यवहार आणि मागणी लक्षात घेऊन नोटांची उपलब्धता वाढवली किंवा कमी केली जाते. ३१ मार्च, २०१८ पर्यंत, 2 हजार रुपयांच्या ३३६.३ कोटी नोटा चलनात होत्या, जे प्रमाण आणि मूल्याच्या संदर्भात अनुक्रमे ३.२७ टक्के आणि ३७.२६ टक्के आहेत. तुलनेत,
नोव्हेंबर २६, २०२१ पर्यंत, २ हजार २३३ एमपीसी कार्यरत होते, जे खंड आणि मूल्याच्या दृष्टीने अनुक्रमे १.७५ टक्के आणि १५.११ टक्के आहे. २०१८-१९ या वर्षापासून नोटांसाठी करन्सी प्रिंटिंग प्रेसमध्ये नवीन इंडेंट टाकण्यात आलेला नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या