28.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयद्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. देशाच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.

भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या होत्या. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणा-या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या