29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयनिर्मला सीतारमण सलग तिस-यांदा फोर्ब्सच्या यादीत

निर्मला सीतारमण सलग तिस-यांदा फोर्ब्सच्या यादीत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : फोर्ब्सकडून दरवर्षी जगातील १०० सर्वात प्रभावी महिलांची यादी जाहीर केली जाते. यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा सलग तिस-या वर्षीही समावेश केला आहे. याशिवाय अन्य तीन भारतीय महिलांचाही समावेश आहे. निर्मला सीतारमण यांनी अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांनाही मागे टाकत थेट ३७ व्या स्थानी झेप घेतली आहे. जगभरातील १०० प्रभावी महिलांच्या यादीमध्ये एकूम चार भारतीय महिलांचा समावेश आहे. त्यात रोशनी नाडर, किरण मुझुमदार शॉ, फाल्गुनी नायर या महिला उद्योगपतींचाही समावेश आहे.

फोर्ब्सने २०१९ आणि २०२० या दोन वर्षी जाहीर केलेल्या १०० प्रभावी महिलांच्या यादीमध्ये निर्मला सीतारमण यांचा समावेश झाला होता. यंदा पुन्हा एकदा त्यांची या यादीमध्ये वर्णी लागली असून त्या ३७व्या क्रमांकावर आहे. अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन या ३९व्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी निर्मला सीतारमण या यादीमध्ये ४१व्या स्थानी होत्या.

नाडर, मुझुमदार, नायर यांचाही समावेश निर्मला सीतारमण यांच्यासोबत एचसीएल टेक्नॉलॉजीच्या संचालिका रोशनी नाडर या यादीत ५२ व्या क्रमांकावर आहेत. बायोकॉनच्या कार्यकारी संचालिका किरण मुझुमदार शॉ ७२व्या तर देशातील सातव्या बिलियनर ठरलेल्या नायकाच्या सीईओ फाल्गुनी नायर या ८८ व्या स्थानी आहेत. रोशनी नाडर या प्रख्यात आयटी कंपनीचे प्रमुखपद सांभाळणा-या पहिल्या भारतीय उद्योजिका आहेत. किरण मुझुमदार शॉ यांनी १९७८ साली बायोकॉनची स्थापना केली होती. फाल्गुनी नायर यांनी महिलांच्या सौंदर्यविषयक सेवा व उत्पादने देणा-या नायका या उद्योगाची स्थापना केली असून नुकत्याच त्या देशातील सातव्या बिलियनर ठरल्या आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या