23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयपंजाबमध्ये कैद्याच्या पाठीवर तप्त सळईने गँगस्टर लिहिले

पंजाबमध्ये कैद्याच्या पाठीवर तप्त सळईने गँगस्टर लिहिले

एकमत ऑनलाईन

फिरोजपूर : पंजाबच्या फिरोजपूर जेल मधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कैद्याच्या पाठीवर गरम लोखंडी सळई ने गैंगस्टर लिहिल्याचा प्रकर समोर आला आहे. आरोपीचा आरोप आहे की जेलच्या काही कर्मच्याऱ्यांनी जबरदस्तीने हे कृत्य केल आहे. त्याच बरोबर त्याच्या आई-वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कपूरथला यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले आणि पोलिसांकडून तपास अहवाल मागवला आहे.

तरसेम नावाचा हा कैदी फेरोजपुर जेल मध्ये बंद आहे, त्याच्यावर हत्या आणि चोरीचे १०-१५ आरोप आहेत. तरसेम म्हणाला जेल मध्ये मला खुप वाईट प्रकारे मारण्यात आल आहे. काही तुरुंग कर्मचाऱ्यांनी लोखंड तापवले आणि माझ्या पाठीवर पंजाबीत गैंगस्टर असे लिहिले. मी वेदनेने रडत होतो पण त्यांचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. या घटने नंतर तरसेलच्या आई-वडिलांनी त्याच्या मुलाच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले,ते म्हणाले की माझ्या मुलाला न्यायालयात आणण्यासाठी पोलिस दुर्लक्ष करत होते.

ते म्हणाले, माझा मुलगा तुरुंगात गेला तेव्हा त्याच्यावर एकच गुन्हा दाखल होता, आता त्याच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल केले आहेत. यासोबतच त्याच्या पाठीवर गैंगस्टर असे घृणास्पद लिहिण्यात आले आहे. त्याला कोर्टात हजर केल्यानंतर तरसेम सिंगने टी-शर्ट काढला आणि न्यायाधीशांना पाठ दाखवली, हे पाहून न्यायाधीशांनाही धक्का बसला. न्यायाधीश राकेश कुमार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. तरसेमचे वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी २४ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या