16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयफक्त गन नव्हे तर पेन घेतलेल्या नक्षलवादाचाही बिमोड करा

फक्त गन नव्हे तर पेन घेतलेल्या नक्षलवादाचाही बिमोड करा

एकमत ऑनलाईन

  नवी दिल्ली : हातात फक्त बंदूक घेतलेल्यांचे आव्हान देशासमोर नाही. तर पेन घेतलेल्या नक्षलवाद्यांमुळेही लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे तरुणांची दिशाभूल होत असल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

फरिदाबाद येथे सुरू असलेल्या राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांच्या चिंतन शिबिराला संबोधित करताना ते बोलत होते.
व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे शिबिराला संबोधित करताना मोदी म्हणाले, तरुणांच्या भावनांचा गैरफायदा घेतला जात आहे. देशाची राष्ट्रीय एकात्मता बिघडवणा-या शक्तींना पराभूत करण्यासाठी बौद्धिक क्षमताही वाढवणे गरजेचे आहे. भारतीय संविधान, कायदा, व्यक्ती स्वातंत्र्याची भाषा या विघातक शक्तींकडून वापरली जाते. साध्या भोळ्या चेह-या मागील देशविघातक शक्ती ओळखणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिसांनी अधिक सक्षम व्हावे.
केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करा
केंद्रीय तपास संस्थांना विविध राज्यांमध्ये तपास करावा लागतो. त्यांना सहकार्य करणे ही स्थानिक पोलिसांची जबाबदारी आहे, असेही मोदींनी सांगितले.
अफवांपासून सावध राहा
सोशल मीडिया हा आक्रमक आहे. त्यामुळे त्याला कमी लेखू नका असे सांगत पंतप्रधान म्हणाले, सोशल मीडियावरून खोट्या बातम्या, अफवा वेगाने पसरतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. कोणतीही बातमी फॉरवर्ड करण्याआधी १० वेळा पडताळणी करून घ्या.

एक देश एक पोलीस गणवेश
पोस्ट खात्याच्या धर्तीवर पोलिसांसाठीही एक देश एक गणवेश असावा, अशी सूचनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या