28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयपबजीने बना दी जोडी!

पबजीने बना दी जोडी!

एकमत ऑनलाईन

रायसेन : ऑनलाईन गेमच्या नादात डोक्यावर परिणाम झाल्याच्या, आत्महत्या केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. ऑनलाईन गेमिंगमुळे फसवणूक झाल्याचे प्रकारही तुम्ही वाचले असतील. ऑनलाईन गेमिंगमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. मात्र मध्य प्रदेशातील रायसेनमध्ये याच्या अगदी उलटे घडले आहे.

ऑनलाईन गेम खेळता खेळता मुलगा, मुलगी एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न केले. आता लग्नाला महिना झाला आहे. दोघांचा संसार अगदी आनंदात सुरू आहे.

मध्य प्रदेशातील रायसेन शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये वास्तव्यास असलेला तरुण दीड वर्षांपूर्वी पबजी खेळता खेळता उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये राहणा-या शीतलच्या संपर्कात आला. दोघांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. व्हॉट्स चॅटपासून सुरू झालेले संभाषण व्हिडीओ कॉलपर्यंत पोहोचले. लग्नाआधी दोघे एकदाच भेटले होते. महिन्याभरापूर्वी त्यांनी भोपाळमध्ये लग्न केले आणि सोबत राहू लागले.

नैनितालमध्ये बीएससीचा अभ्यास करताना शीतलला पबजी खेळण्याची सवय लागली. गेम खेळता खेळता ती योगेशच्या संपर्कात आली. दोन वर्षे दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर शीतल नैनितालहून पळून रायसेनला आली. कुटुंबियांच्या तक्रारीवरून नैनिताल पोलीस शीतलला नेण्यासाठी आले. मात्र तिने स्वत:च्या मर्जीने लग्न केले असल्याने, ती सज्ञान असल्याने पोलिसांना तिच्याशिवाय परतावे लागले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या