22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयपीएम किसान केवायसीला मिळणार मुदतवाढ

पीएम किसान केवायसीला मिळणार मुदतवाढ

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आणि पोर्टलवर डाटा अपलोड करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी एक महिन्याची मुदतवाढ देण्याचे जाहीर केले. याबाबत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मागणी केली होती.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेच्या अनुषंगाने बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह आंध्र प्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगड, आसाम, राजस्थान, केरळ, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आदी राज्यातील कृषिमंत्र्यांची उपस्थिती होती. तसेच या बैठकीस विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव, सांख्यिकीय विभागाचे गणेश घोरपडे उपस्थित होते.

याप्रसंगी मंत्री सत्तार म्हणाले की, पंतप्रधान किसान सन्मान योजनेकरिता शेतक-यांचा डाटा बेस तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून यासाठी केवायसीसाठी पाठपुरावा सुरु आहे. या योजनेअंतर्गत राज्यात आजअखेर एकूण १ कोटी १० लाख लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण ११ हफ्त्यात २० हजार २३५ कोटी रुपये जमा झाले. ११ लाख ३९ हजार नवीन लाभार्थ्यांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. पात्र शेतक-यांची मोठी संख्या पाहता शेतक-यांचे केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या