नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नसल्याचे सरकारने म्हटले आहे.
देशातील उत्तराखंड, झारखंड, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर केंद्राकडून वरील स्पष्टीकरण देण्यात आले. अनेक ठिकाणी पेट्रोलपंपांवर गर्दी वाढल्याने पेट्रोल, डिझेल टंचाईची चर्चा रंगली होती.