बांसवाडा : जिल्ह्यातील एका गावात रात्रीच्या दरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. सहा महिन्यांपूर्वी एका विवाहितेने पतीला सोडून प्रियकरासह पळ काढला, मात्र विवाहितेने रात्री प्रियकरासह पहिल्या पतीच्या घरी पोहोचून गोंधळ घातला.
हा गोंधळ पाहून ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले आणि चक्क प्रियकर आणि विवाहितेला लोखंडी खांबाला बांधले. राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. खमेरा पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात एका विवाहित महिलेने तिच्या प्रियकरासह सासरच्या घरी पोहचत गोंधळ घातला. पतीने दुसरे लग्न केल्याची शंका तीला होती. त्यामुळे या विवाहित महिलेने सासूवर चाकूने हल्ला केला.
विवाहितेचा पती राहुल म्हणतो की, तीन वर्षांपूर्वी त्याचे लग्न बड़ी पडाल येथील अंजली बुनकरशी झाले होते. लग्नानंतर पत्नी अंजली एका एनजीओमध्ये बीए करून शिवणकाम शिकत होती.