23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयबायकोला तिकीट नाकारून सहकारी पक्षाला सोडली राज्यसभेची जागा

बायकोला तिकीट नाकारून सहकारी पक्षाला सोडली राज्यसभेची जागा

एकमत ऑनलाईन

लखनौ : दीर्घ काळ काँग्रेस पक्षात राहिलेले कपिल सिब्बल आता काँग्रेसला राम राम करून समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जाणार आहेत. सिब्बल यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा पाठिंबा घेऊन उमेदवारी अर्ज सादर केलाय. याआधी १६ मे २०२२ रोजी सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. दरम्यान, कपिल सिब्बल यांच्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रील लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी याना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. ते समाजवादी पक्ष आणि राष्ट्रील लोक दलाचे संयुक्त उमेदवार असतील.

विशेष म्हणजे, चौधरी यांच्यासाठी अखिलेश यादव यांनी त्यांच्या पत्नी ंिडपल यांना उमेदवारी नाकारली. दरम्यान, काँग्रेसला दहा दिवसांपूर्वीच सोडचिठ्ठी देणारे कपिल सिब्बल यांनीही समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला. समाजवादी पक्षासोबत आघाडी करून राष्ट्रीय लोक दलाने विधानसभा निवडणूक लढविली होती. आता राज्यसभेसाठी समाजवादी पक्षाकडे तीन जागा आहेत. तिस-या जागेवर अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचे नाव चर्चेत होते. यामुळे जयंत चौधरी हे नाराज झाले होते.

अखेर अखिलेश यादव यांनी पत्नीची उमेदवारी रद्द करून चौधरींना मैदानात उतरवले आहे. आज सकाळीच खुद्द अखिलेश यांनी फोन करून चौधरींना ते राज्यसभेचे उमेदवार असतील, ही माहिती दिली. दररम्यान, उत्तर प्रदेश राज्यसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने आपल्या तिन्ही जागांवर उमेदवार उभे केले आहेत. परंतु, या जागांवर सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचे नाव नाही. अशा स्थितीत आता सपा प्रमुखांच्या पत्नी राज्यसभेवर जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी डिंपल यादव आझमगढमधूनच लोकसभा पोटनिवडणूक लढवू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या