24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयबिहारमध्ये राजकीय उलथापालथ होणार?

बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होणार?

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका बाजूला लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने भाजपा आणि केंद्र सरकारच्या विरोधात युद्ध छेडले, तर दुस-या बाजूला भाजपासोबत युती करून सरकार चालवणारे नीतिश कुमार यांनी आपल्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आता बिहारच्या सत्ताकारणात बदल होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुढचे ७२ तास बिहारच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुढचे ७२ तास आपल्या सर्व नेते, आमदारांना पाटणामधून बाहेर पडण्यास मनाई केली आहे, त्यामुळे हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या