20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeराष्ट्रीयभाजपची आता ‘नमो पंचायत’ मोहीम

भाजपची आता ‘नमो पंचायत’ मोहीम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) गुजरातमधील शेतकरी आणि ग्रामीण भागातील आपली ताकद वाढविण्यासाठी नमो पंचायत आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या गुजरात दौ-यादरम्यान या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

एका महिन्यात सुमारे १४ हजार गावांमध्ये नमो पंचायत होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्र भाजप किसान मोर्चाकडे असणार आहे. याआधी भाजपकडून २०१४ निवडणुकीच्या वेळी चाय पे चर्चा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे नमो पंचायतच्या माध्यमातून भाजप गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आपले पाठबळ वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.

गुजरातमधील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागात भाजपची कामगिरी खराब झाली होती. पक्षाला ग्रामीण भागातील १४३ जागांपैकी केवळ ६४ जागा जिंकता आल्या होत्या. त्याचवेळी भाजपने शहरी भागातील ३९ जागांपैकी ३४ जागा जिंकल्या होत्या.

सूत्राने सांगितले की, यावेळी पक्ष विशेषत: ग्रामीण भाग आणि शेतक-यांवर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत सुमारे १४ हजार गावांमध्ये नमो पंचायत करण्यात येणार आहे. या दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या अशा योजनांची माहिती शेतक-यांना दिली जाईल, ज्याचा थेट फायदा शेतक-यांना होईल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या