24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयभूस्खलनाने कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू

भूस्खलनाने कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मंडी : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात काशन भागात अतिपावसाने झालेल्या भूस्खलनात एकाच घरातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी जेव्हा घरातील पार्थिव बाहेर काढण्यासाठी घराचा दरवाजा तोडत धाव घेतली तेव्हा मृत आई त्याच्या चिमुरड्याला हृदयाशी कवटाळलेल्या अवस्थेत आढळली. भूस्खलनाने कुटुंबातील एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे पार्थिव शरीर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना ऐकून अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

माहितीनुसार ही घटना मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली असून मृत माणसे एकाच घरची आहेत. पोलिसांनी घरातील आठ जणांचे पार्थिव घराबाहेर काढले आहे. शवविच्छेदनासाठी या कुटुंबियांना रूग्णालयात पाठवण्यात आले. मंडी जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि भूस्खलनाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे मंडीचे डीसी अरिंदम चौधरी यांनी सांगितले.

चौफेर होतायेत भुस्खलनाच्या घटना
काळीज पिळवटून टाकणा-या या घटनेबाबत कळताच लोकांच्या डोळ्यातून अक्षरश: पाणी तरळले. पोलिसांनी या भागात तूर्तास बंदी घातली आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी चौफेर होत असलेल्या भूस्खलनामुळे रेस्क्यू टीम वेळेवर घटनास्थळी पोहोचू शकली नाही. गावातील लोकांनी मृत कुटुंबियांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते अशस्वी ठरले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या