24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयममता बॅनर्जी असणार पश्चिम बंगालमधील सर्व विद्यापीठांचे कुलपती

ममता बॅनर्जी असणार पश्चिम बंगालमधील सर्व विद्यापीठांचे कुलपती

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यामधील वाद लपवून राहिलेला नाही. कोणत्याना कोणत्या मुद्यांवरून दोघांमध्ये तणाव पाहायला मिळतो. दुसरीकडे आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारने असा निर्णय घेतला आहे, की ज्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिक्षणमंत्री ब्रत्या बसू म्हणाले, की या निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. आता राज्य सरकार विधानसभेत दुरुस्ती विधेयक आणणार आहे. ते पारित झाल्यानंतर राज्य सरकारच्या विद्यापीठांचे कुलपती आता राज्यपाल नव्हे तर मुख्यमंत्री असतील. यापूर्वी राज्यातील विद्यापीठांचे कुलपती राज्यपाल होते. ते कुलगुरुंची नियुक्ती करत होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या